मी हृदयाने मुस्लिम,पण मला हिजाब घालण्याची गरज वाटत नाही – अरुसा परवेझ

मी हृदयाने मुस्लिम,पण मला हिजाब घालण्याची गरज वाटत नाही – अरुसा परवेझ

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधून सुरु झालेला हिजाबचा मुद्दा देशभरात चांगलाच चर्चेत आहे. या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा होत आहेत तसेच राजकीय पक्ष हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील करत आहे. एकंदरीत या प्रकरणामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालेले असताना आता जम्मू काश्मीरमधील बारावीच्या परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या मुलीने हिजाब घालण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, खऱ्या अर्थाने पुरोगामी भूमिका अरुसा परवेझ असं तिचं नाव असून तिला हिजाब का घातला नाही या गोष्टीवरून ट्रोल केलं जातंय. तिला गळा चिरण्याच्या, ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. आपण मुस्लिम धर्म मानतो, हृदयाने मुस्लीम आहे पण त्यासाठी हिजाब घालायची गरज नसल्याचं सांगत तिने कट्टरवाद्यांना सडेतोड उत्तर दिलंय.

धक्कादायक बाब म्हणजे अरूसीसह तिच्या घराच्यांनाही आता वेठीस धरलं गेलं आहे. तर दुसरीकडे आपण मुस्लिम धर्म मानतो, हृदयाने मुस्लीम आहे पण त्यासाठी हिजाब घालायची गरज नसल्याचं सांगत तिने कट्टरवाद्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे की, “मैं हिजाब से नहीं, दिल से मुसलमान हूं”

याबाबत माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, ‘हिजाब कुणी घातला काय आणि नाही घातला काय त्यावर धर्मातील विश्वास नावाची गोष्ट अवलंबून नाही, त्यापेक्षा ट्रोल्स करणाऱ्यांपेक्षा मी अल्लावर जास्त प्रेम करते, असे तिने म्हंटले आहे. ‘मी मुस्लिम धर्म मानते, मुस्लिम तत्वांना मानते. पण एक चांगली मुसलमान होण्यासाठी मला हिजाब घालण्याची गरज वाटत नाही,’ असे तिने म्हंटले आहे.

दरम्यान, सुमारे आठवडाभराच्या निदर्शने आणि हिंसाचारानंतर उडुपी आणि बेंगळुरूमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर उच्च माध्यमिक शाळा पुन्हा सुरू झाल्या. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पोशाखांवर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या प्रस्तावानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: