भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेऊ ? – अखिलेश यादव

भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेऊ ? – अखिलेश यादव

ग्लोबल न्यूज: देशातील नागरिक आज करोनावर प्रभावी असलेल्या लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे.

तसेच आज देशभरात आज ड्राय रनचं आयोजन करण्यात आले आहे. हे सगळं एककीडे घडत असताना दुसरीकडे समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे एक खळबळजनक विधान समोर आले आहे.

मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही. असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. या संदर्भात एनआयएनने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: