आजचे पंचांग – वार शुक्रवार दि. २४ जून २०२२
(Today Horoscope 24 June 2022)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस
आज विशेष — योगिनी एकादशी
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००
दिशा शूल – पश्चिमेस असेल
आजचे नक्षत्र – अश्विनी ०८.०४ पर्यंत नंतर भरणी
चंद्र राशी – मेष
_________________________
आजचे राशी भविष्य (Today Horoscope 24 June 2022)
मेष – ( शुभ रंग- जांभळा)
आज तुमच्या एखाद्या आवडत्या छंदातूनही तुम्हाला चांगली कमाई होईल. पैशाची अडचण दूर होईल. आज जोडीदाराचे मन जिंकाल. एखादा विवाह जुळवण्यात मध्यस्थी कराल.
वृषभ – ( शुभ रंग- निळा)
व्यवसायातील अनेक अडचणींवर मात करूनही तुमच्या यशाची कमान चढती राहिल. खर्च कमी करून योग्य गुंतवणुकीस प्राधान्य द्याल. घरात थोरांशी मतभेद होऊ शकतात.
मिथुन – ( शुभ रंग – डाळिंबी)
आज तुमच्या कामातील उरक चांगला राहील जे मनी योजल ते तडीस न्याल. इतरांनाही कामात मदत कराल. गृहिणी कौटुंबिक प्रश्न सामंजस्याने सोडवतील.
कर्क – ( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरदारांना वरिष्ठांकडून आज सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्य निष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस असेल. कुटुंबीयांची मात्र नाराजी पत्करावी लागेल.
सिंह – ( शुभ रंग- गुलाबी)
मनसोक्त खर्च केला तरी ही पैशाची कमतरता भासणार नाही. आज दैव तुमच्या बाजूने असून तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मात्र नक्की मिळेल. आज देवही नवसाला पावेल.
कन्या – (शुभ रंग- राखाडी)
आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा अत्यंत कंटाळवाणा दिवस असून आज तुम्हाला एखाद्या सत्संगाची गरज भासेल.
तूळ – ( शुभ रंग – चंदेरी )
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. वक्ते आज व्यासपीठ गाजवतील. आज विरोधक माघार घेतील.
वृश्चिक – ( शुभ रंग – सोनेरी)
कार्यक्षेत्रात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देऊनच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांस यश वाटते तेवढे सोपे नाही. ज्येष्ठांनी क्षुल्लक वाटणारी दुखणी ही अंगावर काढू नयेत.
धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. गरजूना आपण होऊन मदत कराल. आज तुम्हाला आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.
मकर – ( शुभ रंग- क्रीम)
आज तुम्ही आपल्या घरगुती गरजांवर लक्ष केंद्रित कराल. महिलांना गृहोद्योगातून चांगली कमाई होईल. मुलांचे वाढते हट्ट पुरवाल. मागण्या पूर्ण झाल्याने बच्चे कंपनी खुश असेल.
कुंभ – ( शुभ रंग- मरून )
आज तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. श्वसनाचे विकार असतील तर विशेष काळजी घ्या. शेजार्यांशी असलेले मतभेद सुसंवादाने दूर होतील.
मीन – ( शुभ रंग- मोतिया )
तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्याही महत्वाकांक्षा वाढतील. नवीन परिचय व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)