आजचे पंचांग – वार मंगळवार, दि. 01.03.2022
शुभाशुभ विचार – वर्ज्य दिवस.
आज विशेष – महाशिवरात्री.
राहू काळ — दुपारी 03.00 ते 04.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – धनिष्ठा
चंद्र राशी – कुंभ.
—————————————-
आजचे राशीभविष्य
मेष (शुभ रंग – पिस्ता)
दैनंदिन सर्व कामे सुरळीत पार पडतील. कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. संध्याकाळी मित्र-मैत्रिणींसोबत चैन कराल.
वृषभ- ( शुभ रंग- क्रीम)
कार्यक्षेत्रात अथक प्रयत्नाने यशाच्या थोडे फार जवळ जाता येईल. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हिताचे आहे. पिताश्री आज योग्य सल्ला देतील मित्रांना मात्र लांब ठेवा.
मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. आपल्या स्वार्थासाठी विरोधकांनाही एकदा गुड मॉर्निंग म्हणून मोकळे व्हा.
कर्क – (शुभ रंग- सोनेरी)
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. पोट बिघडणार आहे, खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा तरुणांनी चुकीची संगत टाळणे हिताचे राहील.
सिंह- (शुभ रंग – पांढरा)
आज नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. इच्छित ध्येय साध्य होतील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.
कन्या – (शुभ रंग- गुलाबी)
आज काही अप्रिय माणसे संपर्कात येतील. दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल नोकरदार वरिष्ठांच्या मर्जीत असतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ -( शुभ रंग- मोरपिशी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. आज तुम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. आज तुम्हाला आई कडून काहीतरी लाभ होणार आहेत.
वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी )
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल. घराच्या नूतनीकरणाचे मनावर घ्याल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने आनंदित व्हाल.
धनु – ( शुभ रंग-आकाशी)
नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा ही अतिरेक नको, गृहिणींना गृहोद्योगातून चांगली मिळकत होईल.
मकर – (शुभ रंग- जांभळा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्वीकाराल. विरोधकांना आज तुम्ही चोख उत्तर द्याल. लहान भावंडांस मदत कराल.
कुंभ -( शुभ रंग – सोनेरी)
पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. अधिकारांचा गैरवापर महागात पडेल. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो सावध राहा.
मीन – ( शुभ रंग – निळा )
आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. दूरचे प्रवास घडतील.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)