आजचे पंचांग – वार बुधवार, दि. 23 .02.2022
शुभाशुभ विचार — 15 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – कालाष्टमी.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – विशाखा 14.41 पर्यंत, नंतर अनुराधा.
चंद्र राशी – तुळ 08.56 पर्यंत नंतर वृश्चिक.
—————————————-
आजचे राशीभविष्य.
मेष – ( शुभ रंग मोरपिशी)
आज कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. काही नकारात्मक विचार मनात येतील. मोफत सल्ला देणारी माणसे न मागता सल्ले देतील. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.
वृषभ – ( शुभ रंग जांभळा )
इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे नोकरीत साहेबांचे मूड सांभाळणे गरजेचे राहील. घरी जोडीदाराच्या हि लहरी सांभाळावा लागतील.
मिथुन- ( शुभरंग- मरून )
नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागेल. ज्येष्ठा आज काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. महत्वाच्या चर्चा आज टाळा. क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनी ही राग अनावर होईल.
कर्क- ( शुभ रंग- मोतिया )
आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.
सिंह – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. मुलांचे लाड करताना त्यांच्या शिस्तीस ही प्राधान्य द्या.
कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)
कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. प्रॉपर्टी संबंधित आर्थिक व्यवहार आज नकोत. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.
तूळ- ( शुभ रंग- केशरी )
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. वाणीत मृदुता हिताची राहील.
वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )
दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील. आज तुम्ही आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल.
धनु – ( शुभ रंग- पिस्ता)
कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. पायपीट होईल.
मकर- ( शुभ रंग- आकाशी )
आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. इच्छापूर्ती चा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.
कुंभ- ( शुभ रंग- हिरवा )
काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना सहज तोंड द्याल. पिताश्रींनी दिलेले सल्ले विचारात घ्या. मित्रांना थोडे लांबच ठेवा.
मीन – ( शुभ रंग- पांढरा)
ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपुन वापरावी. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. तरुणांनी कुसंगत टाळावी. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल सावध रहा.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)