आजचे पंचांग – वार सोमवार , दि. 21.02.2022
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – चित्रा 16.10 पर्यंत नंतर स्वाती.
चंद्र राशी – तुळ
————————————
आजचे राशीभविष्य–
मेष – धंद्यातील आवक-जावक समान राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. कार्यक्षेत्रातील नवीन आव्हाने आनंदाने स्वीकाराल. वैवाहिक जीवन ही सौख्य पूर्ण असेल.
वृषभ – ( शुभ रंग- निळा )
नोकरदारांनी वरिष्ठांनी दिलेल्या शाब्बासकिस बळी जाऊ नये. हाताखालच्या लोकांचीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.
मिथुन – (शुभ रंग – चंदेरी )
विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल. आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल. आज संध्याकाळी सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या आस्वाद घ्याल.
कर्क – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
दैनंदिन कामाचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काही तरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. कौटुंबिक जीवन समाधानी असेल. महिलांना गृह उद्योगातून चांगली कमाई होईल.
सिंह – (शुभ रंग – पांढरा )
अथक परिश्रम यांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. नवीन झालेल्या ओळखीत स्वतःचे हित साधून घ्याल. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास प्राधान्य देतील.
कन्या- ( शुभ रंग- जांभळा )
मिळकत पुरेशी असली तरीही आज बचतीला प्राधान्य देणे हिताचे राहील. गृहिणी आज सांसारिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पडतील. आनंदी दिवस.
तूळ- ( शुभ रंग – पिस्ता )
घराबाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कुणी शेरास सव्वाशेर भेटू शकतो. दानधर्म करताना स्वतःची शिल्लक आधी तपासा. पत्नी म्हणेल ती पूर्व दिशा हे धोरण हिताचे.
वृश्चिक- ( शुभ रंग- भगवा )
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास कामगारांचे प्रश्न सोडवावे लागतील.
महत्वाच्या चर्चा व बैठकी उद्यावर ढकला.
धनु – ( शुभ रंग- राखाडी)
आज तुमची मोठ्या लोकांमधील ऊठबस फायदेशीर राहील विवाहेच्छुकांना अनुरूप स्थळांचे प्रस्ताव येतील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ होऊ शकतो.
मकर – (शुभ रंग- आकाशी )
हाऊस मौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. वाहतुकीचे नियम मोडले तर दंड चुकणार नाही. आपल्या प्रतिष्ठेस जपा. आज कायद्यात राहिलात तरच फायद्यात राहाल. मित्रांच्या नादी लागू नका.
कुंभ (शुभ रंग -केशरी )
आज काही अयोग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. आज एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळेल.
मीन – ( शुभ रंग तांबडा )
व्यवसायात महत्त्वाचे करार मदार दोन दिवस पुढे ढकललेत तर बरे होईल. आज कोणत्याही कामात रिस्क घेऊ नका. आज थोडे शांततेचे धोरण स्वीकारा. चाललंय ते बरं चाललंय.
शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)