ग्लोबल न्यूज - आजचे पंचांग. वार – बुधवार. 28 एप्रिल 2021
शुभाशुभ विचार — क्षयदिन.
आज विशेष – उत्पत्ती एकादशी.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – चित्रा 08.48 पर्यंत नंतर स्वाती नक्षत्र.
चंद्र राशी – तूळ.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- क्रीम )
नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. तब्येतही जरा नरमच असून आजचा दिवस कंटाळवाणा जाईल. ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. पत्नी आज महत्त्वपूर्ण सल्ले देईल.
वृषभ – ( शुभ रंग- मरून )
नवीन ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. विरोधकांशी धूर्तपणे वागून स्वतःचा स्वार्थ साधून घ्याल. तब्येतीच्या बाबतीत पैशाची काटकसर करून चालणार नाही.
मिथुन – (शुभ रंग- हिरवा )
कुटुंबीयांमधील प्रेम वृद्धिंगत होईल. मुले आज अभ्यासास प्राधान्य देतील. नवीन कलाकारांची प्रसिद्धी ची हौस भागेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.
कर्क – (शुभ रंग – पांढरा )
कोर्टकचेरीची कामे पुढे सरकतील. शेजाऱ्यांकडून काही सुवार्ता येतील. आज आईच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. आज परिवारास पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.
सिंह – ( शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात आज पाहुण्यांची वर्दळ राहील. गृहिणींना उसंत मिळणे कठीण. शेजाऱ्यांशी अबोला असेल तर आज गैरसमज दूर होतील.
कन्या – ( शुभ रंग – पिस्ता )
आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. विरोधक तुमच्या चुका काढतील. संयम ढळू देऊ नका. पत्नी आज योग्य तेच सल्ले देणार आहे. शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील.
तूळ – ( शुभ रंग – मोतिया)
उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. आज खर्च आवाक्याबाहेर जाणार आहे. काहीजणांना अचानक प्रवासास निघावे लागेल. जोडीदाराशी एकमत राहील
वृश्चिक – ( शुभ रंग- सोनेरी )
कंजूष पणा सोडून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. कर्ज हप्ते भरावे लागणार आहेत. खर्च वाढता असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही.
धनु – (शुभ रंग -आकाशी )
नोकरीधंद्यात उत्साही दिवस राहील. योग्य वेळी अधिकार वापरावे लागणार आहेत. प्रतिष्ठितांच्या ओळखी आज कामी येतील. आज एखाद्या मित्रांस मदत कराल.
मकर – ( शुभ रंग- निळा )
दैनंदिन कामातही अडथळे येणार आहेत आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. आज नोकरदारांना जास्त वेळ थांबून काम करावे लागेल
कुंभ – ( शुभ रंग – लाल )
आज तुमचे मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार उद्यावरच ढकलले तर बरे होईल. जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.
मीन – ( शुभ रंग – क्रीम )
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. नोकरदारांना ऑफिसमध्ये साहेबांचे व घरात पत्नीचेही मूड सांभाळावे लागतील. संध्याकाळी सत्संगात रमाल.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार