ग्लोबल न्यूज - आजचे पंचांग. वार – शुक्रवार 26 मार्च 2021
शुभाशुभ विचार – क्षयदिन.
आज विशेष – प्रदोष.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – मघा 21.39 पर्यंत नंतर पूर्वा.
चंद्र राशी – सिंह.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग -मोतिया )
व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील. स्थावराचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल.
वृषभ –( शुभ रंग -सोनेरी )
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवायची जिद्द बाळगाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. भावंडांमधील गैरसमज दूर होतील.
मिथुन – ( शुभ रंग -केशरी )
कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या जुन्या ओळखी आज कामी येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. आज काही महत्वाच्या मेल्स येतील
कर्क –( शुभ रंग- हिरवा )
वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज खिशात पैसाही खेळता असेल. एखाद्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी थोडे बिनसणार आहे.
सिंह – ( शुभ रंग- मरून )
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. आज अहंकारास लगाम गरजेचा असेल. अति स्पष्टवक्तेपणाने काही नाती दुरावतील.
कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी )
आज शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवून वागलेले बरे, अती आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल. दूरचे प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. आज जमा-खर्चाचा ताळमेळ साधणे कठीण जाईल.
तूळ – ( शुभ रंग – चंदेरी )
दैवाची उत्तम साथ असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ध्येयप्राप्तीकडे वेगाने वाटचाल कराल. आज दुपारनंतर एखादा धनलाभ संभवतो.
वृश्चिक – ( शुभ रंग- आकाशी)
आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील.
धनु – ( शुभ रंग- जांभळा)
आज दैव तुमच्याच बाजूने आहे. कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील. घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. भाविकांना देवदर्शनाची ओढ लागेल.
मकर – (शुभ रंग गुलाबी)
आज तुम्हाला उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा मोह होईल, पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे. आज पत्नी जे म्हणेल त्याला होच म्हणा.
कुंभ – ( शुभ रंग – मोरपिशी)
आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. प्रेम प्रकरणांना घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो.
मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. आज स्वावलंबनाचे धोरण हिताचे राहील. येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार