आजचे पंचांग – Today’s Horoscope 13 September 2022
वार – मंगळवार
तारीख 13.9.2022
शुभाशुभ विचार – 11 नंतर चांगला दिवस
आज विशेष – अंगारक चतुर्थी
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30
दिशा शूल – उत्तरेस असेल
आजचे नक्षत्र – रेवती 06.36 पर्यंत नंतर अश्विनी
आजची चांद्रारशी – मीन स. 6.36 पर्यंत नंतर मेष
————————————–
आजचे राशिभविष्य
मेष – (शुभ रंग – तांबडा)
आज तुमची तब्येत जरा नाजूक असेल.सर्दी पडश्याचा त्रास जाणवेल.आज तुम्ही एखाद्या गोष्टीचा फारच विचार कराल.एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल.गोडबोल्या मंडळींपासून लांब रहा.
वृषभ – (शुभ रंग – क्रीम)
आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण फारच वाढेल.घरात थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. देण्याघेण्यात फसवणूक संभवते.मोठे आर्थिक व्यवहार आज टाळलेले बरे.
मिथुन – (शुभ रंग – चंदेरी)
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल.तुमच्यासाठी आज इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसांपूर्वीच्या तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील.कर्ज मंजुरीतील अडथळे दूर होतील.
कर्क – (शुभ रंग – पांढरा)
आज उद्योगधंद्याच्या दृष्टीने पूर्ण अनुकूल दिवस असून नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य असेल.हाताखालचे लोक तुमच्याशी आदबीने वागतील आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.
सिंह – (शुभ रंग – मरून)
नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.वरिष्ठ आपल्यावर खुश आहेतच अशा भ्रमात राहू नये.अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल.
कन्या – (शुभ रंग – आकाशी)
एखाद्या विश्वासू माणसाकडूनही आज विश्वासघात होऊ शकतो.कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा. झटपट लाभाचा मोह टाळा.तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे.
तूळ – (शुभ रंग- मरून)
वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असल्याने आज तुम्हाला जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल.तरीही हातचे राखूनच बोला.तुमची काही गुपिते उघड होतील सतर्क रहा.
वृश्चिक – (शुभ रंग – लाल)
कोणतीही गोष्ट आज सहज साध्य नाही.बेरोजगारांना मात्र नोकरीसाठी संधी चालून येतील. वैवाहिक जीवनात थोडी धुसफुस संभवते.खाण्यापिण्यावर जरा ताबा ठेवा,पोट बिघडेल.
धनु – (शुभ रंग – केशरी)
काही रसिक मंडळी आज कामे बाजूला ठेवूनही मौज मजेस प्राधान्य देतील.मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही आनंदीत व्हाल.मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.
मकर – (शुभ रंग – निळा)
वाहन, वास्तू खरेदीसाठी टाकलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.गृहिणी घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी करतील.पालकांनी मुलांच्या अभ्यासात लक्ष घालणे गरजेचे आहे.
कुंभ – (शुभ रंग – आकाशी)
आज तुमचे मन थोडे चंचल राहील.अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल व ते चुकतील. प्रवासात काही नव्हे हितसंबंध जुळून येतील.शेजाऱ्यांशी आपुलकी वाढेल.
मीन – (शुभ रंग – डाळिंबी)
आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील.क्षुल्लक कारणांवरून शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे.गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्या.
शुभम भवतु
जयंत कुलकर्णी
फोन 9689165424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)