आजचे पंचांग – वार मंगळवार (Today’s Horoscope 2 August 2022)
शुभाशुभ विचार- चांगला दिवस
आज विशेष – नागपंचमी
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30
दिशा शूल – उत्तरेस असेल
आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी १७.२९ पर्यंत नंतर हस्त
चंद्र राशी – कन्या
_________________________
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग- राखाडी)
नोकरदार मंडळी वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. आज अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल. वैवाहिक जोडीदाराकडून आज फार अपेक्षा नकोत.
वृषभ – (शुभ रंग-डाळिंबी)
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल असेल, विलासी वृत्ती बळावेल, कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींच्या महत्वकांक्षा वाढतील. प्रेम वीरांसाठी आज ग्रीन सिग्नल आहे. आज इच्छापूर्तीचा दिवस.
मिथुन – (शुभ रंग – पिस्ता)
कौटुंबिक जीवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची चणचण भासणार नाही. आईचे मन मात्र आज दुखावू नका.
कर्क – (शुभ रंग- पांढरा)
आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन मनाजोगत्या नोकरीचे प्रस्ताव येतील. भावाभावांमध्ये सामंजस्याची भावना राहील.
सिंह – (शुभ रंग- हिरवा)
मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. विश्वासातील माणसाकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. आज कोणालाही मोफत सल्ले देऊ नका.
कन्या – (शुभ – रंग भगवा)
आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारू नका. महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या वेळी द्विधा मनस्थिती होणार आहे. एखाद्या चालू उपक्रमात अडथळा येण्याची शक्यता आहे.
तूळ – (शुभ रंग- नारिंगी)
आकस्मिकपणे आलेल्या व्यवसायिक अडचणींवर यशस्वीपणे मात कराल. इतरांनी दिलेल्या आश्वासनांवर मुळीच अवलंबून राहू नका. दिवस खर्चाचा आहे बिनधास्त खर्च करा. आज बचतीचा विचारच नको.
वृश्चिक – (शुभ रंग केशरी)
कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाह जुळवणी विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य आहे. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल कराल.
धनु – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला बेचैन करतील. कौटुंबिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होईल. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेसे मतभेद होतील परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल.
मकर – (शुभ रंग- गुलाबी)
ज्येष्ठ मंडळींनी तरुणांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असणे हिताचे राहील. आजी-आजोबांनी घरगुती प्रश्नात लक्ष न घालता नातवंडाबरोबर रमावे.
कुंभ -(शुभ रंग- मोरपंखी)
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. नवीन ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज ताकही फुंकून पिणे हिताचे राहील. गाडी चालवताना कोणतीही रिस्क नको.
मीन – (शुभ रंग -आकाशी)
तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. नोकरीसाठी दिलेले इंटरव्ह्यू यशस्वी होतील.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
(ज्योतिषी व वास्तु सल्लागार)