आजचे पंचांग – Today’s Horoscope 17 November 2022
वार – गुरूवार.
17.11.2022.
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
दिशा शूल -दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – मघा 21.20 पर्यंत नंतर पूर्वा.
चंद्र राशी – सिंह.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- पांढरा )
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. कलाक्रीडा क्षेत्रातील नावोदीतांच्या कष्टांचे चीज होईल.
वृषभ (शुभ रंग- निळा)
व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहाल. स्थावरचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या अज्ञातच राहावे.
मिथुन (शुभ रंग- क्रीम)
ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. अति आत्मविश्वास ही नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. काही अति हुशार मंडळी भेटतील, आज कमीच बोला.
कर्क (शुभ रंग- गुलाबी) – Today’s Horoscope 17 November 2022
कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकारल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पाहुण्यांची उठबस आनंदाने कराल.
सिंह (शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दास मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत लक्ष घालाल. प्रवासात काही काळ खोळंबा संभवतो.
कन्या (शुभ रंग- भगवा)
आर्थिक व्यवहारात सावध असणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊन अडकू नका. आज फक्त स्वार्थाकडे लक्ष द्या. परमार्थ आज परवडणारा नाही.
तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज नमतेच घेतील. संततीकडून महत्त्वाचे समाचार येतील.
वृश्चिक (शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही आपल्या ओळखी वापरून इतरांची कामे कराल. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील. आज विरोधकांनाही तुमचे विचार पटवून देता येतील.
धनु- (शुभ रंग- सोनेरी)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. पण हातचे सोडून पळत्या मागे धावण्याचा मोह टाळा. स्वतःवर संयम ठेवा ज्येष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.
मकर (शुभ रंग- केशरी)
आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनःशांती मिळेल. आज कोणतेही धाडस नको.
कुंभ (शुभ रंग – सोनेरी)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.
मीन -(शुभ रंग – मोरपंखी)
नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तब्येत थोडी नरमच राहील पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर नीवळतील.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424