Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 30, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 30 October 2022
वार – रविवार.
30.10.2022
शुभाशुभ विचार – चांगला दिवस
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ -सायंकाळी 4.30 ते 06.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- मूळ 07.26 पर्यंत नंतर पूर्वाशाढा.
चंद्र राशी – धनु.
—————————————-


मेष – (शुभ रंग- केशरी)
नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम तंतोतंत पाळावे लागतील. वरिष्ठांना खुश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. मनःशांतीसाठी सत्संगा शिवाय दुसरा पर्याय नाही.

वृषभ (शुभ रंग- जांभळा)
आज आपल्या मर्यादित राहिलेले बरे. धाडसाची कामे आज टाळलेली चांगली. सासूरवाडी कडून एखादा लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात आज जोडीदाराच्या मतानेच घ्या.

 

मिथुन (शुभ रंग- हिरवा)
भागीदारीच्या व्यवसायात देणे घेण्याचे व्यवहार चोख स्वरूपात करा वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी तुमच्या मनाला आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही काळ खोळंबा संभवतो.

कर्क (शुभ रंग- आकाशी) – Today’s Horoscope 30 October 2022
ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची नितांत आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत निर्विवाद यश मिळेल.

 

सिंह (शुभ रंग- लाल)
उच्चशिक्षित तरुणांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा निश्चित पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. छान दिवस

कन्या (शुभ रंग- सोनेरी)
आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस. कुठेही न जाता मस्त घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. मुलांच्या शिस्तीस प्राधान्य देणे गरजेचे.

 

तूळ (शुभ रंग- पिस्ता)
प्रॉपर्टी विषयी मोठे आर्थिक व्यवहार आज टाळा. आज प्रवासात काही नवे हितसंबंध जुळतील. आज काही अति हुशार मंडळी ही संपर्कात येणार आहेत. डोकं शांत ठेवायला हवं.

वृश्चिक (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल मृदू वणीने विरोधकांनाही आपलेसे कराल. आज नेत्यांची वक्तव्य जन समुदायावर प्रभाव टाकतील. आशादायी दिवस.

 

धनु- (शुभ रंग- निळा)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न असेल. काही साध्या साध्या गोष्टींवरून आज तुम्हाला राग अनावर होईल महत्त्वाच्या चर्चेत आपलेच घोडे पुढे दमटवाल.

मकर (शुभ रंग- मरून)
बेरोजगारांना घरापासून लांब अंतरावर नोकरीच्या संधी चालून येतील अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास करावे लागतील. दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी.

 

कुंभ (शुभ रंग – गुलाबी)
आज आनंदी व उत्साही असा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. तुमची काही अपुरी स्वप्न साकार होतील.

मीन -(शुभ रंग – भगवा)
आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागेल मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवलेले बरे.

 

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
महाराष्ट्राला भिकेला लावण्याचं कंत्राट शिंदे-फडणवीस सरकारने घेतलंय का?

शिंदे सरकारचा लवकर होणार मंत्रिमंडळ विस्तार; बच्चू कडूंची नाराजीही दूर होणार

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group