Monday, March 27, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
September 28, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 September 2022
बुधवार.
तारीख 28.09.2022
शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
दिशा शूल- उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- स्वाती.
चंद्र राशी- तुळ.
————————————–

मेष – शुभ रंग- हिरवा – Today’s Horoscope 28 September 2022

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात आज जोडीदाराचे मत अवश्य घ्या.

वृषभ- शुभ रंग- सोनेरी

कामाच्या ठिकाणी विरोधक चुका काढण्यासाठी टपूनच बसलेले आहेत. नोकरदारांनी नियमांचे उल्लंघन करू नये. नवे उपक्रम राबवताना सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे.

मिथुन- शुभ रंग- राखाडी

शैक्षणिक क्षेत्राविषयी संबंधित व्यवसाय आज चांगले चालतील. उच्च शिक्षित मंडळींना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. तरुणांच्यात चैनी व विलासी वृत्ती वाढेल.

कर्क- शुभ रंग- पांढरा

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागतील. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. प्रेम प्रकरणात फसगत होऊ शकते. आज आईच्या मताचा आदर राखा.

सिंह -शुभ रंग- निळा

आज तुमची एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. रिकामटेकड्या चर्चेतून निष्पन्न काहीच होणार नाही. आज फक्त कृतीस प्राधान्य द्या.

कन्या- शुभ रंग- डाळिंबी

धंद्यातली येणी वसूल होतील. विरोधकांशी गोड बोलून आपला स्वार्थ तुम्ही साधून घ्याल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व सिद्ध करू शकाल. हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील.

तूळ- शुभरंग- आकाशी

आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. स्वतःचेच खरे कराल. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल. दूर से प्रवास त्रासदायक होणार आहेत आवश्यक नसतील तर टाळा.

वृश्चिक- शुभ रंग- मरून

आज पर्यटन व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामे गती घेतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. अतिस्पष्ट बोलण्याने तुमचे काही हितचिंतकच दुरावतील.

धनु- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस असल्याने फक्त शुभ चिंता. तुम्ही सहजच घेतलेले निर्णयही आज योग्य ठरतील. काही दुरावलेली नाती सुद्धा जवळ येतील. विरोधक मैत्रीचा हात पुढे करतील.

मकर- शुभरंग- पिस्ता

नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण राहील. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. कार्यक्षेत्रात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट गरजेचे आहेत. जिवलग मित्र ही आज दगा देतील सतर्क रहा.

कुंभ- शुभरंग- मोरपंखी

नोकरी धंद्याच्या दृष्टीने आज थोडासा विरोधी दिवस असल्याने नोकरीच्या ठिकाणी साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. कायद्याची चौकट मोडू नका व हातचे सोडून पळत्या मागे धाऊ नका.

मीन- शुभरंग- भगवा

आज फक्त आपलं कसं भागतंय एवढं बघा फार परोपकार करायला जाऊ नका. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. आणि जोडीदार जे काय म्हणेल त्याला हो म्हणून विषय ताबडतोब संपवून टाका.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांना मातृशोक

साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांना मातृशोक

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group