आजचे पंचांग वार – मंगळवार, दि. 15.03.2022
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – भौम प्रदोष
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – आश्लेषा 23.33 पर्यंत. नंतर मघा नक्षत्र.
चंद्र राशी – कर्क 23.33 पर्यंत नंतर सिंह.
—————————————
आजचे राशीभविष्य
मेष ( शुभ रंग- पिस्ता)
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस आहे. कुठेही न जाता घरीच आराम करावा असा तुमचा मूड असेल. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही आज समाधानी व्हाल.
वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)
आज तुम्हाला मुलांच्या काही शैक्षणिक समस्या भेडसावतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास होणार आहे.
मिथुन- ( शुभ रंग- निळा)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे उत्तम सहकार्य राहिल. नेहमीच्या कामा व्यतिरिक्त एखादी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागेल. आज आवक समाधानकारक असेल.
कर्क ( शुभ रंग- हिरवा)
आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी पैसाही खर्च कराल. आपल्या सडेतोड बोलण्याने कुणाच्या तरी भावना दुखावतील.
सिंह (शुभ रंग -आकाशी)
ज्येष्ठांनी प्रकृतीची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.
कन्या ( शुभ रंग- सोनेरी)
नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. व्यवसायातील उलाढाल वाढेल. सामाजिक जीवनातली प्रतिष्ठा वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.
तूळ – (शुभ रंग- पांढरा)
नोकरीत आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. विरोधकांनाही आज चहा पाजून आपलेसे करावे लागेल. अहंकारास जरा लगाम द्या. थोडे वाका पण मोडू नका.
वृश्चिक ( शुभ रंग -जांभळा)
आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय आज अचूक ठरतील. क्षुल्लक कारणाने घरातील मोठ्यांशी मतभेद संभवतात. जे काय करायचे ते मिटल्या तोंडी करा.
धनु (शुभ रंग -मोरपंखी)
कुठलीही गोष्ट आज सहजसाध्य नसुन अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नको. वैवाहिक जीवनात आज जोडीदारास फार प्रश्न विचारू नका.
मकर (शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अथक प्रयत्ना शिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपून त्यांना रोजगार मिळेल. काही येणी असतील तर मागितल्याशिवाय मिळणार नाहीत.
कुंभ -( शुभ रंग-मोतिया)
अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालावे लागणार आहे. आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवा. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट द्यावी लागेल.
मीन – (शुभ रंग-चंदेरी)
एखाद्या सामाजिक कार्यात आज पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील.आज प्रेम प्रकरणे फुलतील बहरतील.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)