आजचे पंचांग – वार – सोमवार, दि. 13.06.2022 (Todays Horoscope 13 June 2022)
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र -अनुराधा 21.24 पर्यंत नंतर ज्येष्ठा.
चंद्र राशी – वृश्चिक.
________________________
आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 13 June 2022)
मेष – (शुभ रंग – लाल )
आज कुठलीही गोष्ट सहज साध्य होणार नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ नक्की लाभेल. वैवाहिक जीवनात शब्दांचा वापर कमीच करा.
वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)
आज कारण नसताना दुसऱ्याच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज पत्नीला दिलेली वचने पाळाल.
मिथुन – (शुभ रंग- क्रीम)
नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.
कर्क – (शुभ रंग -चंदेरी)
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही जणांचा आज गूढ शास्त्राकडे कल वाढेल. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयात गोडी निर्माण होईल.
सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
काही मनाजोगत्या घटनांनी तुमचे मनोबल वाढेल. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. इतरांना आज मदत करू शकाल. सासूबाईंनी केलेल्या कौतुकाने गृहिणी धन्य होतील.
कन्या – (शुभ रंग – हिरवा)
आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात कुणाला शब्द दिले असतील तर ते पाळावे लागतील. आज बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. गृहिणींचा शेजारी सलोखा राहील.
तूळ – (शुभ रंग – जांभळा)
आर्थिक स्थिती आज उत्तम असून तुमचे मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. आज संध्याकाळी सहकुटुंब चैन करणार आहात. अति सडेतोड बोलणे टाळा, त्यामुळे नाती दुरावतील.
वृश्चिक – (शुभ रंग- मरून)
आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मान पान मिळेल. आज तुम्ही थोडे संवेदनशील असाल. एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल.
धनु – (शुभ रंग- भगवा)
जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे आज जरासे अवघड जाईल. गृहिणींना पूर्वी केलेली बचत कामी येईल. प्रवास होतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
मकर – (शुभ रंग – निळा)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहिल. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील.
कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही अतिउत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. अधिकारांचा योग्य वापर करण्याची वेळ येणार आहे. भिडस्तपणा नको.
मीन – (शुभ रंग – मोतीया)
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. वादविवादात आज तटस्थ रहा. थोडे अध्यात्माकडे वळणे हिताचे राहील.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार).