Sunday, March 26, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
May 19, 2022
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार गुरूवार, दि. 19.05.2022

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – संकष्ट चतुर्थी. ( चंद्रोदय 22.42)

राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वाषाढा.

चंद्र राशी – धनु.

—————————————-

आजचे राशीभविष्य –

मेष – ( शुभ रंग -निळा)

व्यवसायातील महत्त्वाचे करार उद्या वर ढकलले तर बरे होईल. नोकरदार कितीही राबले तरी वरिष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही. आजी-आजोबांनी फार खोलात न शिरता फक्त नातवंडात रमावे.

वृषभ- ( शुभ रंग- निळा)

विरोधक सक्रिय असताना कामात चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. कोणाकडून कसली अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळच येणार नाही.

मिथुन- ( शुभ रंग- गुलाबी)

समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल. आज जोडीदार तुमच्यावर अगदी बेहद खुश असेल.

कर्क- ( शुभ रंग- हिरवा)

आज तुम्हाला काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटू शकतात. मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे. कुणाकडे सल्ले मागायला जाऊच नका. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असतील.

सिंह – ( शुभ रंग – मोतिया)

आज तुम्हाला नेहमीच्या त्याच त्या कामाचा कंटाळा येईल. हौशी मंडळी तर आज चक्क कामावर दांडी मारून जीवाची मुंबई करतील. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.

कन्या – ( शुभ रंग – लाल )

आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. सासूबाईंनी केलेल्या कौतुकामुळे गृहणी सुखावतील. काही भाग्यवान आज  नव्या घराचा ताबा घेतील.

तुळ – (शुभ रंग -आकाशी)

आज तुम्हाला एखाद्या अर्जंट कामासाठी अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर डोके शांत ठेवा. वाद टाळा. शेजारी आज  फारच गोड गोड बोलतील.

वृश्चिक ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. आज नेत्यांची भाषणे प्रभावी होतील. प्रवास मात्र कंटाळवाणे होतील.

धनु – (शुभ रंग- जांभळा)

तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखाद्या प्रश्‍नात सामंजस्याने मार्ग काढावा लागेल. पत्नीचे सल्ले डावलू नका. श्वसनाचे विकार असतील तर काळजी घ्या.

मकर -( शुभ रंग- भगवा)

असा एखादा खर्च उद्भवेल कि जो टाळता येणे शक्य नाही. घरातील थोरांचे ही सल्ले विचारात घेणे आवश्यक राहील. ज्येष्ठ मंडळींनी अती दगदग टाळावी. आज थकवा जाणवेल.

कुंभ – ( शुभ रंग- मरून)

व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. संतती बाबत काही आनंददायी घटना घडतील. जे मनी योजाल ते तडीस न्याल. गर्भवतींना मनोवांछित संतती चा लाभ होईल.

मीन – ( शुभ रंग – नारंगी)

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल इतरांना जे अशक्य ते तुम्ही शक्य करून दाखवाल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस आहे. कर्तव्यापुढे इतर गोष्टी आज तुमच्या दृष्टीने गौण असतील .

!! शुभम भवतु !!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
पुन्हा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

पुढील पाच दिवस कोकण, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Recent Posts

  • राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • एकनाथ शिंदेचा राऊतांना दणका;संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवले; कीर्तिकरांची नियुक्ती!
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • भाग्यकांता सामाजिक सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी सुनिता गाडेकर तर सचिवपदी गणेश शिंदे
  • ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा बार्शीत गुन्हा दाखल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group