आजचे पंचांग – वार मंगळवार, दि. 05.04.2022
शुभाशुभ विचार – 17 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – विनायक चतुर्थी ( अंगारक योग ).
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – कृतिका 16.52 पर्यंत नंतर रोहिणी.
चंद्र राशी – वृषभ.
________________________
मेष – ( शुभ रंग- आकाशी)
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गृहिणी कौटुंबिक जबाबदारी हसतमुखाने पार पाडतील. आज गरजेपुरता पैसा अगदी सहज उपलब्ध होईल. आनंदी दिवस.
वृषभ- ( शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. आवक मनाजोगती असल्याने तुमची मनस्थिती आज उत्तम असेल. उपवरांना स्थळे सांगून येतील. आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस आहे.
मिथुन – ( शुभ रंग -मोरपिशी )
आज तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. पैशाची कमतरता भासणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचाही चांगलाच प्रभाव पडेल. आज डोळ्यांची काळजी घ्या.
कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करावे लागतील. उत्पादनांचा दर्जाही वाढवावा लागणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील
सिंह – (शुभ रंग – डाळिंबी)
नोकरदारांना साहेबांच्या मागे-पुढे करावेच लागेल. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा अजिबात बाळगू नका. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका.
कन्या – (शुभ रंग- सोनेरी)
शासकीय कामे रखडतील. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा असेल. सत्संगाने मानसिक बळ मिळेल. विदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना संधी चालून येतील.
तुळ – ( शुभ रंग- चंदेरी)
आज काही नकारात्मक विचार मनात येतील काही क्षुल्लक गोष्टींनी ही राग अनावर होईल. वाहन चालवत असाल तर डोके शांत ठेवा. व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच गुंतवणूक वाढवा.
वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. अशावेळी अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्यायला कमीपणा वाटून घेऊ नका. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणून मोकळे होणे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने चांगले.
धनु- ( शुभ रंग- भगवा)
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक नमते घेतील, आज तुम्हाला श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल. काही विसरलेली येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.
मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. घरासाठी काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.
कुंभ- (शुभ रंग- क्रीम)
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊन अडकू नका.
मीन- ( शुभ रंग- मरून)
कौटुंबिक वाद असतील तर ते आज दुपारनंतर सुसंवादाने मिटू शकतील. दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. महत्वाच्या मेल्स येतील. मित्रांच्या मंगल कार्यास हजेरी लावाल.
!! शुभम भवतु!!
– जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)