ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग वार – शनिवार, दि. 04 सप्टेंबर 2021
शुभाशुभ विचार – 08 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – शनिप्रदोष.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – पुष्य 17.45 पर्यंत, नंतर आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
_______________________
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित काही व्यवसाय असतील तर ते चांगले चालतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत, यश सोपे नाही. आज काही कौटुंबिक समस्या सोडवाव्या लागतील.
वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)
कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. अपेक्षित मेल्स येतील. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार उद्या वरच ढकला. मातोश्रींचे मन जपायला हवे.
मिथुन- ( शुभ- रंग क्रीम)
सर्व लहान मोठे आर्थिक व्यवहार यशस्वीरित्या पार पडतील. पैशाची आवक मुबलक राहील. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात आजचा दिवस मजेत जाईल
कर्क – ( शुभ रंग- तांबडा)
नोकरी धंद्याच्या ठिकाणी आज अहंकारास थारा देऊ नका. मृदू वणीने अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील. गृहिणी एखादा विवाह जमवण्यात यशस्वी मध्यस्थी करतील.
सिंह- ( शुभ रंग – सोनेरी)
आज घरातील थोरांशी मतभेद संभवतात, पण फार ताणू नका. त्यांच्या वयाचा मान राखायला हवा. दूरच्या प्रवासात आज आपला मौल्यवान ऐवज सांभाळा.
कन्या – ( शुभ रंग – भगवा)
नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. मित्रमंडळीत तुमच्या शब्दास मान राहील. आज अनपेक्षित धनलाभ होतील. नव्या धंद्याची सुरुवात करण्यास आज योग्य दिवस.
तुळ – (शुभ रंग- आकाशी)
आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कृपा राहील. एखाद्या मित्राला तुमच्या मदतीची गरज भासेल.
वृश्चिक- ( शुभ रंग – पांढरा)
कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही, तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाची साथ निश्चित मिळेल. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.
धनु- ( शुभ रंग – केशरी)
आज तुम्ही आधी स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक आहे.
मकर- ( शुभ रंग- गुलाबी)
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढणार आहे. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील. आज आशादायी दिवस.
कुंभ-( शुभ रंग- मोरपंखी)
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. आज सकाळी साहेबांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. रुग्णांनी डॉक्टरच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.
मीन – ( शुभ रंग – पिस्ता)
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. आनंदी दिवस असून आजची संध्याकाळ प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात व्यतीत कराल.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)