ग्लोबल न्यूज - आजचे पंचांग. वार – शुक्रवार. 9 एप्रिल 2021
शुभाशुभ विचार — प्रतिकूल दिवस.
आज विशेष –प्रदोष.
राहू काळ — सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल -पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ 24.17 पर्यंत नंतर मीन.
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग – पिस्ता)
दैनंदिन सर्व कामे सुरळीत पार पडतील. स्वतःचे काही छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. मोठे आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरकून घ्या.
वृषभ – ( शुभ रंग- क्रीम)
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हिताचे आहे. पिताश्री आज योग्य सल्ला देतील मित्रांना मात्र आजच्या दिवस लांबच ठेवा.
मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची साथ मिळेल. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस अजिबात थारा देऊ नका. ज्येष्ठांना उपासनेचे फळ मिळेल.
कर्क – (शुभ रंग- सोनेरी)
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. पोट बिघडणार आहे, खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे. तरुणांनी चुकीची संगत टाळणे हिताचे राहील. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा.
सिंह – (शुभ रंग – पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. इच्छित ध्येय साध्य होतील. वैवाहिक जीवनातील गोडवा वाढेल. महत्वाच्या कामांसाठी दुपारपर्यंत ची वेळ उत्तम.
कन्या – (शुभ रंग- गुलाबी)
आज काही अप्रिय माणसे संपर्कात येतील. मोफत सल्लगार मंडळीही भलतेच बोअर करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. गोडबोल्या मंडळी पासून दोन हात दूरच रहा.
तूळ – ( शुभ रंग- मोरपिशी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. आज तुम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल.
वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी )
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल. घराच्या नूतनीकरणाचे मनावर घ्याल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने आनंदित व्हाल.
धनु – ( शुभ रंग-आकाशी)
नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. आत्मविश्वासाचा अतिरेक नको, कारण त्याने निराशा पदरी पडू शकते.
मकर – (शुभ रंग- जांभळा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्वीकाराल. विरोधकांना आज तुम्ही चोख उत्तर द्याल. लहान भावंडांस मदत कराल.
कुंभ – ( शुभ रंग – सोनेरी)
आज हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. कार्यक्षेत्रात गाफील राहून चालणार नाही. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो सावध राहा.
मीन – ( शुभ रंग – निळा )
आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला आश्वासने देऊ नका. मित्रच विश्वासघात करतील. आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार