ग्लोबल न्यूज - आजचे पंचांग. वार – शुक्रवार, दि. 07 मे 2021
शुभाशुभ विचार – १९.०० नंतर चांगला दिवस.
आज विशेष – वरुथिनी एकादशी.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा १२.३६ पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा
चंद्र राशी – मीन.
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग – राखाडी)
आज स्वार्थाकडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना स्वतःची शिल्लक तपासा. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळले तर बरे होईल. तातडीचे प्रवास संभवतात.
वृषभ – (शुभ रंग – मरून)
आत्मविश्वासाने नवे उपक्रम राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेली कामे सुरू करता येतील. लघु उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.
मिथुन – (शुभ रंग – पिस्ता)
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य राहिल. तुमची सकारात्मकता वाढेल.
कर्क – (शुभ रंग – गुलाबी)
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा. उपासनेत खंड पडू देऊ नका.
सिंह – (शुभ रंग – चंदेरी)
आज काही अतिहुशार मंडळी संपर्कात येतील. वाद-विवाद होतील. जरा डोके शांत ठेवण्याची गरज आहे. वाहन चालवताना डोक्यात विचारांची गर्दी नको.
कन्या – (शुभ रंग – पांढरा)
आज नोकरीच्या ठिकाणी हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क करून लवकर घर गाठाल. थोडी चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. वैवाहिक जीवनात आज दोघात तिसरा येऊ देऊ नका.
तूळ – (शुभ रंग – नारिंगी)
व्यवसायात ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश निश्चित मिळणार आहे. आज तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा नको.
वृश्चिक – (शुभ रंग – सोनेरी)
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील. आज कामापुरतेच बोलणे हिताचे राहील.
धनु – (शुभ रंग – निळा)
आज अथक परिश्रमांच्या साह्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. काही योग्य माणसे आज संपर्कात येतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल. आशादायी दिवस
मकर – (शुभ रंग – आकाशी)
नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील. विनाकारण शेजाऱ्यांच्या भानगडीत लक्ष घालू नका.
कुंभ – (शुभ रंग – जांभळा)
अत्यंत आनंदी उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून. परिवारात सामंजस्य राहील.
मीन – (शुभ रंग – क्रीम)
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून विश्रांतीस प्राधान्य द्या.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार