ग्लोबल न्यूज - आजचे पंचांग. वार – बुधवार 31 मार्च 2021
शुभाशुभ विचार –भद्रा दीन.
आज विशेष — संकष्ट चतुर्थी. (चंद्रोदय -21.36)
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – स्वाती 09.45 पर्यंत नंतर विशाखा.
चंद्र राशी – तुळ.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – क्रीम)
कार्यक्षेत्रात कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभणार आहे. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.
वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरीही तुमचा कामातील उत्साह दांडगा असेल. आजच्या कष्टांचे फळ आज नाही तरी उद्या नक्कीच मिळेल. गृहिणी आपल्या आवडत्या छंदातून ही कमाई करू शकतील.
मिथुन – (शुभ रंग- डाळिंबी)
सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागेचे प्रश्न सुटतील. काही भाग्यवान महिला आज उंची रत्न खरेदी करतील. ब्युटी पार्लर तेजीत चालतील.
कर्क – (शुभ रंग- पिस्ता)
एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी कराल. काहींना तातडीच्या कामासाठी प्रवासाला निघावे लागेल. गृहिणींना मुलांच्या पुस्तकात डोकवावे लागेल.
सिंह – ( शुभ रंग- पांढरा)
कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात आज पाहुण्यांची वर्दळ राहील.
गृहिणींना उसंत मिळणे कठीण. शेजाऱ्यांशी अबोला असेल तर आज गैरसमज दूर होतील.
कन्या – ( शुभ रंग – जांभळा )
अति सडेतोड बोलण्यामुळे काही हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. नाती सांभाळायची असतील तर डोके थंड आणि वाणीत गोडवा असू द्या. एखाद्याची स्तुती करण्यात कंजूसपणा नको.
तूळ – ( शुभ रंग- मरून )
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल. काही हरवले असल्यास दुपारनंतर गवसेल. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकतील.
वृश्चिक – (शुभ रंग- नारिंगी)
सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावाल. जिवलग मित्रांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. सकाळी भरलेले खिसे दुपारनंतर मात्र रिकामे होण्याची शक्यता आहे.
धनु – (शुभ रंग – केशरी )
नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. काही कर्ज प्रस्ताव केले असतील तर ते मंजूर होऊ शकतील. विरोधक आता दमले आहेत, त्याची काळजी नको.
मकर – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
वडीलधारी मंडळी त्यांचे विचार तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. वाद न घालता फक्त हो म्हणा आणि सोडून द्या. त्यांच्या वयाचा मान राखणे गरजेचे आहे. आज कायदा मात्र मोडू नका नाकासमोर चालणेच हिताचे राहील.
कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)
सम व्यवसायिक स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. कोणतेही गैरवर्तन नको. आज आपल्या प्रतिष्ठेस जपा. आरोग्याचीही काळजी घ्या.
मीन – ( शुभ रंग- निळा)
आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. दुपारनंतर काही वाद संभवतात, पण त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार
साभार एमपीसी न्यूज