आजचे पंचांग – वार सोमवार. दि . 04. 07. 2022 (Today Horoscope 4 July 2022)
शुभाशुभ विचार -12 पर्यंत चांगला.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – मघा 08.44 पर्यंत नंतर पूर्वा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह.
______________________
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – डाळिंबी)
कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींसाठी अत्यंत आशादायी दिवस. खेळाडू स्पर्धा जिंकतील. बरेच दिवसांनी तुम्हाला अपेक्षित असलेली प्रिय व्यक्ती संपर्कात येईल. सहकुटुंब चैन कराल.
वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)
नोकरदारांना काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोड निर्माण होईल. गृहिणी आज संध्याकाळी मॉलमध्ये फेरफटका मारतील. मुलांचे लाड पुरवाल.
मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)
आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसायात चांगले चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. एखादा पत्ता शोधण्यासाठी भटकंती होईल. शेजाऱ्यांशी असलेले मतभेद दूर होतील. (Today’s Horoscope 4 July 2022)
कर्क – (शुभ रंग – राखाडी)
आज कार्यालयीन कामासाठी काही जवळपासचे प्रवास घडतील. अधिकारी वर्गाने कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे. गृहिणींनी सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.
सिंह – (शुभ रंग- भगवा)
आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. हितशत्रू सक्रिय असल्याने बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यायला हवे.
कन्या – ( शुभ रंग – हिरवा)
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मनसोक्त खर्च करू शकाल. जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवाल. कर्ज प्रस्ताव रखडतील.
तूळ – ( शुभ रंग- केशरी)
ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. देण्यघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात करावेत. दूरच्या प्रवासात काही चांगल्या व्यक्तींशी हितसंबंध जुळून येतील.
वृश्चिक – ( शुभ रंग- नारंगी)
पर्यटन व्यवसाय उत्तम चालतील. काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. अधिकारी वर्गास अधिकार वापरावे लागतील. ध्यानीमनी नसताना काही जुनी येणी वसूल होतील.
धनु – ( शुभ रंग- गुलाबी)
नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दोन हात दूरच रहा.
मकर – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्हाला कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळीत मिळून-मिसळून राहणे गरजेचे आहे. ज्येष्ठांना सत्संगाची ओढ लागेल. (Today’s Horoscope 4 July 2022)
कुंभ – (शुभ रंग- आकाशी)
आजचा दिवस तितकासा अनुकूल नसल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यायला हवा. ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही.
मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)
घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. वैवाहिक जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटले तरी हातचे राखूनच बोलणे हिताचे राहील.
!! शुभम भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)