ग्लोबल न्यूज - आजचे पंचांग. वार – गुरुवार. 29 एप्रिल 2021
शुभाशुभ विचार — 12 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – अनुराधा 14.29 पर्यंत नंतर जेष्ठा.
चंद्र राशी – वृश्चिक.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – सोनेरी)
आज तुम्हाला काही गोड बोली माणसे भेटतील. देण्यघेण्याच्या व्यवहारात सतर्क राहा. प्रलोभनांना अजिबात बळी जाऊ नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस.
वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.
मिथुन – ( शुभ रंग – चंदेरी)
आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. नोकरीत काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. कितीही काम केले तरी वरिष्ठांचे समाधान होणे केवळ अशक्य.
कर्क – ( शुभ रंग- पांढरा)
आज तुम्हाला रुटीन कामाचा कंटाळा येईल. आपल्या कर्तव्या पेक्षा मौजमजा करण्यास प्राधान्य द्याल. बरेच दिवसानी जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. विलासी वृत्ती बळावेल.
सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज घरात आर्थिक सुबत्ता येईल. मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल. तुम्ही भावनेच्या भरात घेतलेले काही निर्णय मात्र कदाचित चुकण्याची शक्यता आहे. वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवेल.
कन्या – ( शुभ रंग – मरून)
आज काही अति हुशार मंडळी तुमच्या संपर्कात येतील. रिकामटेकड्या चर्चेत काही मतभेद होण्याची शक्यता आहे. मानसिक संतुलन ढळू देऊ नका.
तूळ – ( शुभ रंग – निळा)
वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. आज शेजाऱ्यांशी काही मतभेद संभवतात. आज केवळ गाप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्या. जमाखर्चाचा तराजू समतोल राहील.
वृश्चिक – ( शुभ रंग – क्रीम)
आज अति धावपळ टाळा. हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क ला प्राधान्य देणे हिताचे राहील. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येणार आहेत. वेळेचे नियोजन महत्त्वाचे राहील.
धनु – (शुभ रंग- राखाडी)
कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू काहीसा डळमळीत होण्याची शक्यता आहे. काही दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. आपल्या मौल्यवान वस्तूची आज काळजी घ्या.
मकर – ( शुभ रंग – मोरपंखी)
वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजुरी होईल. विद्यार्थ्यांकडून आज कौतुकास्पद कामगिरी होईल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुम्ही म्हणाल ती पूर्व कराल.
कुंभ – ( शुभ रंग – मोतिया)
व्यवसायात काही नवे करार यशस्वी होतील. यश आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. ज्येष्ठांना प्रकृती उत्तम साथ देईल.
मीन – ( शुभ रंग- जांभळा)
नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही विनंती करायची असेल तर आजचा दिवस योग्य नाही. आज एकांताची गरज भासेल.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार