आजचे पंचांग – रविवार, दि. 21.11.2021
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – रोहिणी 07.36 पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ 21.10 पर्यंत नंतर नंतर मिथुन.
_______________________
आजचे राशीभविष्य –
मेष – (शुभ रंग- पांढरा)
व्यवसायात आज काही उत्तम संधी चालून येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. आज प्रवास कंटाळवाणे होतील. कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणाच कामी येईल, प्रलोभने टाळा.
वृषभ – (शुभ रंग- आकाशी)
आज दुपारनंतर अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करायला आज दिवस उत्तम आहे. नवे व्यावसायिक करार यशस्वी होतील.
मिथुन – (शुभरंग- मोरपंखी)
आज तुम्ही कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल. घरातील थोर मंडळींबरोबर काही मतभेद होतील. अनावश्यक खर्चावर ताबा असलेला बरा. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
कर्क – (शुभ रंग – डाळिंबी)
उद्योग व्यवसायात आज मनाजोगती धनप्राप्ती होईल. काही नवीन हितसंबंध तयार होतील. मित्र आज दिलेली आश्वासने पळतील. नाती सांभाळायची असतील तर फार खोलात न शिरता गोड गोड बोला.
सिंह – (शुभ रंग- पिस्ता)
आज हौस मौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल. तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावे.
कन्या – (शुभ रंग – सोनेरी)
व्यवसायात मोठ्या आर्थिक उलाढाली करताना भागीदारांना विश्वासात घ्या. नोकरीच्या ठिकाणी साहेबांचे मूड सांभाळणे गरजेचे आहे. ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेला पैसा जपून वापरावा.
तूळ – (शुभ रंग – चंदेरी)
आज मनाच्या द्विधा अवस्थेत कोणतेही निर्णय घेण्याची घाई करू नका. विरोधकांना व स्पर्धकांनाही कमजोर समजू नका. घरात वडीलधार्या मंडळींच्या हो ला हो करून विषय संपवलेला बरा.
वृश्चिक – ( शुभ रंग- केशरी)
वैवाहिक जीवनात एकमत असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. आज धाडसाची कामे टाळा. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.
धनु – (शुभ रंग – चंदेरी)
केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. मागून नावे ठेवणार्या मंडळींकडे दुर्लक्ष करा. वैवाहिक जीवनात संध्याकाळी जुन्या आठवणी ताज्या कराल.
मकर – ( शुभ रंग- क्रीम)
काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील, सतर्क राहा. आज फक्त आपला स्वार्थ बघा. मित्रांना पार्टी आज नको. एखादा जुना आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.
कुंभ – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बर्याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आशादायी दिवस असून आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.
मीन – (शुभ रंग – मरून)
आज रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिले तर बरे होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. ऑफिस मधील महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)