आजचे पंचांग – वार – मंगळवार, दि. 26.10.2021
शुभाशुभ विचार –चांगला दिवस.
आज विशेष — सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.
______________________
आजचे राशीभविष्य-
मेष- (शुभ रंग- मोतिया)
आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. महत्वाचे व्यावसायिक करार यशस्वी होतील. भविष्यकाळाच्या दृष्टीने फायदेशीर ओळखी होतील.
वृषभ – ( शुभ रंग- तांबडा)
नोकरी-व्यवसायात उत्साही वातावरण राहील. अनपेक्षित होणारे लाभ मनाला दिलासा देतील. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. दैव आज तुमच्याच बाजूने आहे.
मिथुन – (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल. तुमचा उत्साह व कार्यक्षमताही वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आर्थिक सुबत्ता येईल.
कर्क – (शुभ रंग- क्रीम)
हट्टीपणा सोडा, मनाच्या लहरीपणास आवर गरजेचा आहे. अति महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून आपल्या तब्येतीकडे ही लक्ष द्यायला हवे. उधारी उसनवारी आज नको.
सिंह- ( शुभ रंग- हिरवा)
काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. खर्च वाढला असला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. जुन्या गुंतवणुकीतून मनाजोगता लाभ पदरात पडेल.
कन्या- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत.
तुळ – ( शुभ रंग -आकाशी)
नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही देवाला एखादा नवस करतील.
वृश्चिक -( शुभ रंग – जांभळा)
काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. फास्ट ड्रायव्हिंग टाळा. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.
धनु – ( शुभ रंग- निळा)
आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.
मकर – ( शुभ रंग – चंदेरी)
आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल.
कुंभ -( शुभ रंग -गुलाबी)
आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करावा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.
मीन – ( शुभ रंग- भगवा)
उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. आज तुम्ही इतरांस दिलेले शब्द पाळू शकाल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)