Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
October 25, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – सोमवार. तारीख 24 ऑक्टोबर 2022 (Today’s Horoscope 24 October 2022)

शुभाशुभ विचार- आनंदी दिवस.

आज विशेष – नरक चतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजन.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.

दिशा शूल- पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र- हस्त 14.42 पर्यंत नंतर चित्रा.

————————————–

मेष – शुभ रंग- मरुन

आज कुठलीही गोष्ट सहज साध्य नाही, तरीही तुमची काही येणी असतील तर ती मात्र आज वसूल होऊ शकतील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की लाभेल

वृषभ- शुभ रंग- क्रीम

हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी मनापासून खर्च कराल. नवोदित कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल.

मिथुन- शुभ रंग- हिरवा (Today’s Horoscope 24 October 2022)

नोकरदारांना कामावर दांडी मारून मस्त घरी आराम करावासा वाटेल. आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. गृहिणींना मुलांच्या अभ्यासात डोकवावेच लागेल.

कर्क- शुभ रंग- पिस्ता

शेजाऱ्यांशी काही कारणांनी झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज अचानक जवळपासचे प्रवास घडू शकतात. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम आवश्यक.

सिंह -शुभ रंग- गुलाबी

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस. जे मनी योजाल ते तडीस न्याल. कमी श्रमातही जास्त लाभ आज पदरात पडू शकतो जिवलग मित्र-मैत्रिणी तुमचा शब्द झेलतील.

कन्या- शुभ रंग- निळा 

आज वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांना चांगला वाव मिळेल. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.

तूळ- शुभरंग- केशरी

आज दिवस खर्चाचा असल्याने काही अत्यावश्यक खर्च करावाच लागणार आहे. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्र खरेदी होईल.

वृश्चिक- शुभ रंग- चंदेरी (Today’s Horoscope 24 October 2022)

जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय तुमच्याकडून घेतले जातील. उपवरांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

धनु- शुभ रंग- सोनेरी

आज ऑफिसमध्ये तुम्हाला कामाचा प्रचंड ताण राहील. कामाच्या व्यापात कुटुंबीयांसाठी वेळ काढणे अशक्य होईल. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा नको.

मकर- शुभरंग- सोनेरी

आज तुम्हाला दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री आहे  घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. आज सज्जनांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील.

कुंभ- शुभरंग- निळा

आज हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतेही धाडसाची कामे आज शक्यतो टाळा. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

मीन- शुभरंग-पांढरा

कौटुंबिक सदस्यात आज सुसंवाद असल्याने तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रातही आत्मविश्वासाने वावराल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहाल. अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराची खंबीर साथ राहील.

शुभम भवतु

– जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
…दोन तासानंतर व्हॉट्स अॅप सुरू, युजर्सचा जीव भांड्यात!

...दोन तासानंतर व्हॉट्स अॅप सुरू, युजर्सचा जीव भांड्यात!

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group