घाटकोपर | दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदुहृदयसम्राट असे म्हंटल जात. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हिंदूह्दय सम्राट असा उल्लेख करण्यात येतो. आज घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचे उद्घाटन आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी भले मोठे बॅनर लावले आहेत. त्यावर राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असे लिहले आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या लावलेल्या त्या बॅनरची सध्या चर्चा होत आहे.
घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी राज ठाकरे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर्स मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. यात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट लावण्यात आले आहे. सध्याच्या बँनरची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. अशातच आता मनसेने हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता, त्यातच थेट राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे हिंदुहृद्यसम्राट म्हटल्याने या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा होत आहे. तसेच या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेसह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.