हाथी नही गणेश है ! ब्रह्म विष्णू महेश है | आज पासून बसपाचे ब्राम्हण सम्मेलन !

 

उत्तरप्रदेश | येणाऱ्या काही दिवसात उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुक होणार आहे, या निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. तर भाजपाला सत्तेतून खाली उतरवण्यास समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.

त्यातच उत्तर प्रदेशात जातीय समिकरण साधण्यासाठी आजपासून बसपा संपूर्ण राज्यात ब्राह्मण सम्मेलनाचे आयोजन करत आहे. विशेष म्हणजे रामाची नगरी असलेल्या अयोध्येतून ब्राह्मण सम्मेलनांची सुरुवात होत आहे. बसपा सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. अयोध्येनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, अशा प्रकारच्या सम्मेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आजपासून अयोध्येतील तारा जी रिसॉर्टमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. यानंतर सायंकाळी सतीश चंद्र मिश्रा शरयू आरतीतही सहभागी होतील. मायावतींनी २००७ मध्ये विधानसभा निवडणुकीत दलित आणि ब्राह्मण मतांवर लक्ष केंद्रित केले होते. तेव्हा मायावतींचे समिकरण अगदी फिट बसले होते आणि त्या सत्तेत आल्या होत्या. आता यावेळी त्या, दलित, ब्राह्मण आणि मुस्लीम समीकरण तयार करून सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत.

Team Global News Marathi: