गोव्यातील विमानतळास मनोहर पर्रीकरांचे नाव, पंतप्रधान मोदींच्याहस्ते लोकार्पण

 

गोव्यातील जनतेकडून मिळालेलं प्रेम, स्नेह मी विकासाच्या रूपात व्याजासह परत करीन, असे भावनिक उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट’ असे नाव देत या विमानतळाचे लोकार्पण केले मोपा येथे रविवारी हा सोहळा पार पडला. या सोहळयाला आँएकमेवर उपस्थित होते तसेच यावेळी मनोहर पर्रीकरांचा आठवणींना उजाळा देण्यात आला.

मोपा विमानतळाला माझे प्रिय मित्र व गोवेकरांचे लाडके नेते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देताना मला अतिशय आनंद होत आहे. या विमानतळामुळे गोव्याच्या कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल आणि पर्यटनामुळे गोव्याची अधिक प्रगती होईल, असेही मोदींनी म्हटले.

आमच्या सरकारने देशात विमानतळांचे जाळे वाढवले असून, गेल्या आठ वर्षांत ७२ नवीन विमानतळं उभारली आहेत. २०१४ पर्यंत देशात फक्त ७० विमानतळ होते, तेदेखील केवळ मोठ्या शहरांमध्ये परंतु गेल्या आठ वर्षात आम्ही ७२ विमानतळांची उभारणी केली. पूर्वीच्या सरकारांसाठी विमान प्रवास ही लक्झरी होती. आम्ही लोकांच्या दारापर्यंत विमानतळ नेले.

निवडणूक जवळ येत असल्याने लोकांशी कनेक्टेड राहण्याचा मंत्र भाजपच्या मंत्री, आमदारांना दिला आहे. मोपा विमानतळाच्या उद्घाटनानंतर त्यांनी मुख्यमंत्री मंत्री व सत्ताधारी आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली. प्रत्येकाशी संवाद साधला तसेच त्यांच्या कामाबद्दल माहितीही जाणून घेतली.

Team Global News Marathi: