भाजपा आमदार गोपीचंद पडळकर याने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष करत घणाघाती टीका केली आहे. पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन केले आहे. शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होणार होते, मात्र त्या आधीच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन पडळकर यांनी केले आहे.
मागच्या अनेक दिवसांपूर्वीच हा पुतळा उभा करण्यात आला होता. जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. पण कोरोनाचा काळ असल्याने त्याचे उद्घाटन थांबवण्यात आले होते. शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार होते.
शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचे उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होते. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केले आहे. यावर आता राष्ट्रवादी काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.