सोने-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ ; जाणून घ्या आजचे दर

सोने-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारामध्ये प्रति तोळ्यामागे सोन्याचा भाव 242 रुपयांनी वाढला (Gold Price Today) आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47 हजार 242 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी शुक्रवारीही सोन्याचा भावात वाढ दिसून आली होती.

सोन्यासह चांदीतही तेजी पाहायला मिळाली. चांदीचा दर प्रति किलोमागे 543 रुपयांनी (Silver Price Today) वाढला. एक किलो चांदीचा भाव आता 62 हजार 248 रुपये झाला आहे. शुक्रवारी हाच दर 61 हजार 705 रुपये एवढा होता.

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. जर तुम्ही २२ कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी

यंदाच्या वर्षी स्वस्तात सोने खरेदी करण्याची तुमच्याकडे अखेरची संधी आहे. सरकारने सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या विक्रीची तारीख जाहीर केली आहे. आज 29 नोव्हेंबरपासून ते पुढील पाच दिवस ही संधी तुमच्याकडे आहे. यात एक ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 7 हजार 791 रुपये मोजावे लागतील. ऑनलाईन पेमेंट केल्यास 50 रुपयांचा फायदाही होईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: