सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली जाणून घ्या आजचे दर

सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली जाणून घ्या आजचे दर

मुंबई, 13 जुलै : सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) चढ-उतार सुरुच आहेत. आज सोन्याच्या किमतीत (Gold Rate Today) पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरातही (Silver RAte Today) घट झाली आहे. सोन्याच्या दर आज प्रति तोळे 50 हजार 656 रुपये आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50656 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. काल म्हणजेच शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 50 हजार 878 रुपये प्रति तोळे ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 222 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे.

मात्र सोन्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकाशी तुलना केली तर सोने आजही 5,544 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

आज चांदीचा दर 55888 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 56097 प्रति किलो दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर किलोमागे 209 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण होत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव 9.55 डॉलरनी घसरून 1,723.65 डॉलर प्रति औंस दराने व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी 0.12 डॉलरच्या घसरणीसह 18.95 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: