वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचयव्हर त्यांच्या सुनेने लावलेल्या गंभीर आरोपांमुकले राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती .रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर पतीच्या कुटुंबियांकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तडस यांच्या सुनेने मदतीची मागणी केली आहे. तसा व्हिडीओच चाकणकरांनी ट्विट केला आहे.
मात्र दुसरीकडे खासदार रामदास तडस यांनी मारहाणीचे आरोप फेटाळताना मुलगा आणि सुनेची भांडणं आहेत, यात माझी काही संबंध नाही, उलट मी मध्यस्थाची भूमिका बजावल्याचं त्यांनी पत्रकार माध्यमांशीही बोलताना बोलून दाखविले होते.माझा मुलगा आणि सूनबाई लग्नानंतर कुटुंबापासून वेगळे राहत असल्याचं सांगत या सगळ्या प्रकरणात माझी काहीच भूमिका नाही. ही वैयक्तिक नवरा बायकोची भांडणं आहेत. यात राजकारण कुठून आलं, मला माहिती नाही असं तडस म्हणाले.
रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. हा केवळ १२ सेकंदांचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते” असे त्या व्हिडिओमध्ये म्हंटल आहे.
वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत.पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत. @NagpurPolice@maharashtra_hmo pic.twitter.com/PHAxlD2X3F
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 8, 2021