सोने चांदी दरात पुन्हा वाढ; राज्यात सोने स्वस्त तर चांदी दरात वाढ

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या भावात मंगळवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीनुसार देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतीत 55 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव (Gold Price) प्रति 10 ग्रॅमसाठी 50,735 रुपये इतका झाला.  एचडीएफसी सिक्युरिटीनुसार, जागतिक पातळीवर मजबुती मिळाल्याने सोन्याचे दर स्थानिक बाजारात वाढले.  याप्रमाणे गेल्या सत्रात सोन्याचा भाव हा 50,680  रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.



सोन्यासोबत चांदीचा हाजीर भावात मंगळवारी 170 रुपयांनी वाढ झाली आहे यामुळे चांदीचा दर हा 61,780 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. जो गेल्या सत्रात 61,610 रुपये इतका होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमॉडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, ‘ दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव जागतिक बाजारपेठेत सोन्याला मजबुती मिळाल्याने मंगळवारी 55 रुपयांनी वाढला. 

महाराष्ट्रात सोने स्वस्त, चांदीत वाढ

सोन्याच्या दरात आज घट दिसून आली. आज सोनं प्रति 10 ग्रॅम 30 ते 40 रुपयांनी घट झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 50,950 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 49,950 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,990 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,980 रुपयांवर बंद झाला होता.

सोन्याच्या दरात घट झाली असली तरी महाराष्ट्रात चांदीच्या दरात किरकोळ वाढ दिसून आली. चांदीत 200 रुपये प्रति किलोची वाढ झाली. काल 61,700 वर असलेली चांदी आज 61,900 रुपयांवर विक्री सुरू आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: