भीतीदायक: देशात कोरोनाचा कहर 2020 मृत्यू तर पॉझिटिव्ह रुणांचा आकडा तीन लाखाजवळ

नवी दिल्ली : कोरोना (corona) नावाचा बकासूर दिवसेंदिवस आपलं रुप विक्राळ करत असून आपल्या विळख्यात लाखो जणांना घेत आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या वाढली असून मृतांच्या संख्येनेही आपला विक्रम मोडला आहे. प्रत्येक दिवशी सर्वाधिक मृत्यूंचा विक्रम स्थापित होत आहे. मृत्यूंचा आकडा स्थिरावत नसून तो सतत वाढत आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, गेल्या २४ तासात २०२० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे, पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनामुळे दोन हजार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी २ लाख ९४ हजार ११५ जण कोरोनाबाधित सापडले असून ही संख्या पण सर्वाधिक आहे. दरम्यान गेल्या २४ तासात झालेल्या मृतांचा आकडा पकडून देशात आतापर्यंत एकूण १ लाख ८२ हजार ५७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्यांची संख्या एकूण १ कोटी ५६ लाख ९ हजार ००४ झाली आहे. उपचाराधीन असलेल्यांची संख्या २१ लाख ५० हजार ११९ वर पोहचली आहे.

आठवड्याभरात मृत्यूमध्ये साडे ९४ टक्क्यांची वाढ

एप्रिल महिन्यात झालेल्या मृत्यूंची संख्या
तारीख मृत्यूंची संख्या
२१ एप्रिल २०२० जणांचा मृत्यू
२० एप्रिल १७६१ मृत्यू
१९ एप्रिल १६२० मृत्यू
१८ एप्रिल १४९८ जणांचा मृत्यू
१७ एप्रिल १३३८ मृत्यू
१६ एप्रिल ११८४ मृत्यू
१५ एप्रिल १०३८ जणांचा मृत्य
सर्वात जास्त संसर्ग असलेले राज्य

महाराष्ट्रात सर्वाधिक संसर्ग झालेला असून येथे संसर्ग होण्याचा दर हा १६.३ टक्के आहे. त्यानंतर गोवा राज्य असून येथील प्रमाण ११.६ टक्के. तिसऱ्या स्थानी नागालँड आहे येथे संसर्गाचे प्रमाण ९ टक्के आहे. त्यानंतर चौथ्या स्थानी केरळ राज्य असून येथील प्रमाण ८.८ टक्के आहे. तर छत्तीसगड पाचव्या स्थानी असून येथील संसर्गाचे प्रमाण ८.५ टक्के आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: