मुंबई : शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. तृप्ती सावंत यांनी काल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.
तृप्ती सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती.तृप्ती सावंत यांना डावलूनत्या ठिकाणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवार देण्यात आली होती. मात्र या भांडणात इशांत सिद्दीकी यांचा विजय झाला होता.त्यानंतर शिवसेनेतून तृप्ती सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही तृप्ती सावंत यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न केले, पण ते प्रयत्न अयशस्वी ठरले. निष्ठावंत शिवसैनिक बाळा सावंत यांच्या तृप्ती सावंत या पत्नी आहेत. बाळा सावंत वांद्रे पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते. पण त्यांच्या निधनाने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता.