कर्नाटक : बी.एस.येडियुरप्पा यांच्या सरकारच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ होताना दिसत आहे. भाजपचे कर्नाटकातील माजी मंत्री रमेश जारकीहोली यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या तरुणीने आता आणखी एक व्हिडीओ जारी केला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे.
सदर ४.२७ मिनिटांच्या व्हिडीओतून तिने आपल्या व आपल्या पालकांच्या जीवाला जारकीहोली यांच्याकडून धोका असल्याचे सांगितले आहे. व्हिडियोत तरुणी म्हणाली आहे की, ‘ मला आता हा मानसिक छळ सहन होत नाही. त्यामुळे मी त्याच्या हातून मरण्यापेक्षा स्वत:चा जीव घेईन, जारकीहोली यांनी मला धमकी दिली आहे. असून ते ते या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत.
ते सांगतात की त्यांनी मनात आणलं तर एका दिवसात राज्यातील सरकार पडेल. त्यासाठी त्यांना कितीही पैसा ओतावा लागला तरी चालेल. ते सगळ्यांना तुरुंगात धाडतील. याचा काय अर्थ आहे? ते काहीही करू शकतात.’ असं म्हणत तिने या व्हिडियोत अनेक खुलासे केले आहे.
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी सदर महिलेचे व जारकीहोली यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्या व्हिडीओत ती व माजी मंत्री रमेश जारकीहोली हे आक्षेपार्ह स्थितीत दिसत होते. या प्रकरणात भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी या मौन बाळगले होते. ज्या रमेश यांच्यावर आरोप करण्यात येत आहे त्यांनाही यासंदर्भात कोणतही भाष्य केलेले नाही.