पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी नाव आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार राठोड यांनी कालच आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिला आहे.
पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर विरोधकांनी आघाडी सरकारला आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना घेरले होते. त्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत आणि चित्रा वाघ यांनी या प्रकारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती . तसेच राठोड यांना तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य केले होते.
दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या महत्वच्या नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन, कडक कारवाई केली. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केलेले आघाडी सरकारमधील राठोड हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले तरी ते शिवसेनेचे नेते आहेत.