राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्या आकाशात आगीचे गोळे; रहस्यमय प्रकाशामुळे लोकं धस्तावले

मुंबई : राज्यातील नागपूर, अमरावती आणि अनेक राज्यांमध्ये शनिवारी रात्री आकाशात रहस्यमय प्रकाश दिसून आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशात आगीचे भलेमोठे आगीचे गोळे वेगाने जाताना दिसत होते. नक्की हे काय प्रकरण आहे. याबाबत काही लोकांमध्ये उत्सुकता तर काही लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती.

नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि इतर जिल्ह्यात शनिवारी रात्री आकाशात आगीचे गोळे दिसून आले. त्या उल्कातर नाही ना… याविषयी अनेकजण चर्चा करीत होते. तर काहींच्या मते जळालेल्या विमानाचे पार्ट्स असतावेत. तर काहींच्या मते ते तुटता तारा असावेत.

प्रथमदर्शनी समोर आलेल्या व्हिडीओमधून हे उल्कापिंड असल्याचे बोलले जात आहे. नागपूरच्या खगोलतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, कोणत्यातरी उपग्रहाचा अपघात झाला असावा. त्यामुळे हे उल्कापात पडले असावेत. परंतू या घटनेबाबत लोकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालं आहे.

आकाशातील हे अद्भूत दृश्य महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांत पाहायला मिळालं. त्याचवेळी मध्य प्रदेशातील इंदूर, खरगोन, झाबुआ आणि बरवानी जिल्ह्यातील अनेक लोकांनी हे दृश्य पाहिल्याचा दावा केला आहे. जोनाथन मॅकडॉवल (Jonathan McDowell) या अमेरिकन शास्त्रज्ञानं ट्विट केलं आहे की, मला वाटतं की हे चीनचे रॉकेट चेंग झेंग 3बी होते, जे पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करत होतं. हे रॉकेट गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रक्षेपित करण्यात आलं होतं. पृथ्वीच्या दिशेने परत येत असताना, वातावरणाच्या संपर्कात आल्यानं त्याचे भाग जळत होते.

नागपुरातील स्कायवॉच ग्रुपचे चेअरमन सुरेश चोपडे यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना असाच अंदाज व्यक्त केला. ते म्हणाले की, या तेजस्वी रेषा उल्का पावसाशी संबंधित असण्याची शक्यता खूपच कमी आहे. यातून रंगीबेरंगी दिवे बाहेर पडत होते, जे उल्कापिंडांचे असू शकत नव्हते. जेव्हा त्या वस्तूमध्ये धातूची वस्तू असते तेव्हाच हे रंग दिसतात. मला वाटतं एकतर कुठल्यातरी देशाचा उपग्रह चुकून पडला असावा किंवा काम पूर्ण झाल्यावर जाणूनबुजून क्रॅश केला असावा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: