नरेंद्र मोदीजी २०२४ ला सुरक्षित मतदार संघ शोधा, तृणमूल काँग्रेसने दिले आव्हान

पश्चिम बंगालमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीला आता सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरु केल्या आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली होती.

ममता बॅनर्जी यांनी आपला सुरक्षित भवानीपूर मतदारसंघ सोडून बंडखोरी रोखण्यासाठी नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत.

या ठिकाणी काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराभूत होत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेला तृणमूलने उत्तर दिले आहे. “दीदी, नंदीग्राममधून जिंकत आहे. दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. नरेंद्र मोदीजी पश्चिम बंगालमध्ये अर्ज भरण्याच्या अखेरीस तुमचं खोटं लोकांच्या नजरेत येण्याच्या आधीच लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न थांबवा. आपण २०२४ साठी सुरक्षित मतदासंघ शोधा, कारण वाराणसीमध्ये तुम्हाला आव्हान दिलं जाईल,” असे उत्तर दिले आहे.

Team Global News Marathi: