ग्लोबल न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. रूपाली चाकणकर उद्या (गुरुवारी) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं. अखेर या पदावर रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणशैलीने ओळखल्या जातात. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
भाजप आणि शिवसेना सरकारच्या काळात विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी होत्या. त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महामंडळ आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द केल्या. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचं पदही रिक्त झालं होतं.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (@ChakankarSpeaks) यांची राज्य सरकारने नियुक्ती केली. याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा!
— Supriya Sule (@supriya_sule) October 20, 2021
दरम्यान, महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला होता.
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीमती @ChakankarSpeaks यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मी त्यांना सुयश चिंतते. आयोगाची नीटशी बसविलेली घडी सुमारे दीड वर्षांपासून विस्कळीत झालीय. आता चाकणकर यांच्या नियुक्तीने आयोगाच्या कामाला चांगली गती मिळेल, अशी खात्री आहे. pic.twitter.com/wT61SF7CLK
— Vijaya Rahatkar (@VijayaRahatkar) October 21, 2021