मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. आता या आरोपांवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सडेतोड टीका केली आहे.
यावेळी अमृता फडणवीस यांनी एक चारोळी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. महाविकासाआघाडी ही एकत्र मिळून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.
पचास इधर देंगा,पचास उधर देंगा फिर धूर्त राजा कुछ क्यूँ बोलेंगा, अवाम को चूना लगाके खुद ऐश कारेंगा ! कोई कुछ बोला तो मनसुख जैसा मरेंगा ! चोर चोर मौसेरे भई ! मिल बाँट के नोट महाविकास आघाडी’ने खई ! असा शब्दात अमृता फडणीवसांनी ट्विट करून निशाणा साधला आहे.
पचास इधर देंगा,पचास उधर देंगा
फिर धूर्त राजा कुछ क्यूँ बोलेंगा ,
अवाम को चूना लगाके खुद ऐश कारेंगा !
कोई कुछ बोला तो मनसुख जैसा मरेंगा !चोर चोर मौसेरे भई !
मिल बाँट के नोट #MahaVasooliAghadi ने खई ! #MahaVikasAghadi #MaharashtraGovernment #Maharashtra #100Crore #MansukhHiren pic.twitter.com/6hP7xZVx65— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 21, 2021