राष्ट्रपिता महात्मा गांधीं यांच्या पणतीला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली ७ वर्षाचा तुरुंगवास

दक्षिण आफ्रिका | दक्षिण आफ्रिका येथे राहणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पणतूला एका व्यवसायिकाला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. ५६ वर्षीय आशिष लता रामगोबिन असे महात्मा गांधी यांच्या पणतूचे नाव आहे. आशिष लता रामगोबिन यांना डरबनच्या एका कोर्टाने ६० लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ७ वर्षाची शिक्षा सुनावली असून त्यांना जेलमध्ये पाठवलं आहे. सोमवारी कोर्टाने त्यांचा निर्णय सुनावत आशिष लता रामगोबिनला दोषी ठरवलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार स्वत:ला व्यावसायिक असल्याचं भासवत आशिष लताने स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक करत त्यांच्याकडून ६२ लाख रुपये उकळले होते. या घटनेतील पीडित एसआर महाराज यांनी सांगितले की, नफ्याचं आमिष दाखवून माझ्याकडून पैसे घेण्यात आले. व्यावसायिक एसआर महाराज यांनी आशिष लता यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. महाराजने लता यांना एक कन्साइमेंट इम्पोर्ट आणि कस्टम क्लिअर करण्यासाठी ६२ लाख रुपये दिले होते. परंतु अशाप्रकारे कोणतंही कन्साइमेंट नव्हतं अशी माहिती समोर आल्यावर एसआर महाराज यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले होते.

 

लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची मुलगी आहे. लता यांना डरबन विशेष व्यावसायिक क्राईम कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षेविरोधात अपील करण्यास परवानगी नाकारली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितले की, लता रामगोबिन यांची न्यू आफ्रिकेतील अलायंस फुटविअर डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक एसआर महाराज यांच्यासोबत ऑगस्ट २०१५ मध्ये भेट झाली होती.

महाराज यांची कंपनी लिननचे कपडे आणि बूट आयात, उत्पादन आणि विक्री करतं. त्याचसोबत त्यांची कंपनी इतर कंपन्यांना प्रोफिट शेअरच्या आधारे पैसे देते. लता रामगोबिन यांनी महाराज यांना सांगितले की, त्यांनी दक्षिण आफ्रीकी हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी लिननच्या कपड्यांचे ३ कंटेनर भारतातून आयात केले आहेत मात्र यातून महाजन यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

Team Global News Marathi: