फेसबुकचे नाव होणार आता ‘मेटा’ !

 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकच्या होल्डिंग कंपनीचे नाव आता बदलण्यात आले असून ही कंपनी आता ‘मेटा’ (META) या नव्या नावाने ओळखली जाईल. गेल्या काही दिवसांपासून, फेसबुक री-ब्रँडिंग करणार असल्याची बातमीही चांगलीच वायरल होताना दिसून येत होती. अखेर, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली.

यावेळी मार्क झुकरबर्ग यांनी मेटावर्ससंदर्भात आपल्या व्हिजनवरही भाष्य केले. झुकरबर्ग म्हणाले, आपल्यावर एक डिजिटल जग बनले आहे. ज्यात व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट आणि एआयचा समावेश आहे. तसेच, मेटावर्स मोबाइल इंटरनेटची जागा घेईल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

 

नवी होल्डिंग कंपनी मेटा फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअ‍ॅप आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी ब्रँड ओकुलस सारख्या अ‍ॅपचाही समावेश करेल. फेसबुकने मेटावर्स प्रोजेक्टमध्ये २०२१ मध्ये १० बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अर्निंग रिपोर्टमध्ये कंपनीने घोषणा केली होती, की त्यांचा व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी सेगमेंट एवढा मोठा झाला आहे, की आता तो आपल्या उत्पादनांना दोन श्रेणींमध्ये विभागू शकतो.

तसेच नाव बदलण्याबरोबरच आता कंपनीमध्ये रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. तसेच मेटावर्ससाठी आपल्याला हजारो लोकांची आवश्यकता आहे, अशी घोषणाही कंपनीने केली होती. सध्या कंपनी १० हजार लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे.

Team Global News Marathi: