Friday, June 2, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऊर्जामंत्र्यांची घोषणा ; पुढील तीन महिने शेतकऱ्याच वीज कनेक्शन तोडले जाणार नाही

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 15, 2022
in राजकारण
0
ऊर्जामंत्र्यांची घोषणा ; पुढील तीन महिने शेतकऱ्याच वीज कनेक्शन तोडले जाणार नाही

 राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज तोडणी केली आहे, त्यांचा वीजपुरवठा पुर्ववत केला जाणार असल्याचे वक्तव्य नितीन राऊत यांनी केले. तसेच शेतकऱ्यांच्या हातात पुढचे पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा खंडीत केला जाणार नसल्याचं राऊत यांनी सभागृहात सांगितलं. या मुद्यावरुन सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला होत.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी केली होती, त्या शेतकऱ्यांची वीज आज दिवसभरात जोडली जाणार असल्याचे राऊत यांनी सभागृहात सांगितले. शेतकऱ्यांना प्राथमिकता देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पिक येईपर्यंत पुढचे तीन महिने वीज तोडणी तात्पुरत्या स्वरुपात थांबवत आहोत असे राऊत म्हणाले. दरम्यान, या मुद्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.

शेतकऱ्यांबाबत ठाकरे सरकारला कोणतीही संवेदना नाही. मागील अधिवेशनात दिलेलं आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलं नसल्याचे फडणवीस म्हणाले. हे सरकार सावकारी आणि सुलतानी पद्धतीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी करत आहे. याविरोधात आम्ही आवाज उठवत राहू असेही फडणवीस यावेळी म्हणाले होते. मागील अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट घोषणा केली होती की, मे महिन्यापर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज तोडणी केली जाणार नाही. मग त्यांनी दिलेलं आश्वासन का पूर्ण होत नाही? असा सवाल फडणवीस यांनी केला. ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं वीज कापते असेही ते म्हणाले होते.

दरम्यान, वीज तोडणीच्या मुद्यावरुन विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. ठिकठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली होती. तत्काळ वीज तोडणी थांबवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. दरम्यान, राजू शेट्टींनी देखील या विरोधात आक्रम भूमिका घेतली होती. त्यांनी शेतकऱ्यांनी दिवसा 10 तास वीज द्या असी देखील मागणी केली आहे. आता यावर सरकार काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: ऊर्जामंत्री नितीन राऊतरद्दविजतोडणीशेतकरी
ADVERTISEMENT
Next Post
सिंधुताईं सपकाळ यांची अपूर्ण इच्छा पुर्ण होणार ; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

होय, 'त्यांची' तिकिटं माझ्या सांगण्यावरून कापली! पंतप्रधान मोडियन भाजपा नेत्यांना सुनावले

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group