अरे कोण आला रे कोण आला म्हणत भर पावसात ठाण्यात एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत
|
CM Eknath Shinde in Thane | मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री ठाण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ठाण्यात जंगी स्वागत करण्यात आलं.मुसळधार पावसात ठाणेकर मुख्यमंत्र्याच्या स्वागताला हजर राहिले होते.
Eknath Shinde
भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आज ते पहिल्यांदा ठाण्यामध्ये दाखल झाले होते.
Eknath Shinde
बंड केल्यानंतर राज्याबाहेर गेलेले एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री होऊन ठाण्यात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांचं मोठ्या उत्साहात समर्थकांकडून स्वागत करण्यात आलं.मुख्यमंत्र्यांसाठी ठाणेकर मुसळधार पावसात उभे होते.
CM Eknath Shinde
शिंदे-फडणवीस सरकारनं १६४ सदस्यांचा पाठिंबा मिळवत विधानसभेतील बहुमत चाचणी आज जिंकली. विधानसभा अध्यक्ष निवडीपाठोपाठ बहुमत चाचणी जिंकून सरकारनं विरोधी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आणि पहिला टप्पा पार केला.
CM Eknath Shinde
विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले.
CM Eknath Shinde
एकनाथ शिंदे हे अनेक दिवसांनी आपल्या नातवाला भेटले.
CM Eknath Shinde
भाजपाच्या ठाणे शहरातील खोपट येथील कार्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री भेट दिली.
CM Eknath Shinde
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील भाषणात आपल्या नातवाचा उल्लेख केला होता. ठाण्यातील घरी आल्यानंतर आजोबा आणि नातवामधील जिव्हाळा पाहायला मिळाला.
CM Eknath Shinde
ठाण्यातील घरी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीयांकडून औक्षण करण्यात आले.