आता पर्यंत आपण रस्त्यावे, हातगाडीवर किंवा डोक्यावर वाहून नेणाऱ्या टोपलीतून फळभाज्या विकलेल्या पहिल्या असतील. पण एका शेतकऱ्यांनी चक्क ३० लाखांच्या नव्याकोऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमधून फळ-भाज्या आणि वांगी विक्री करत असल्याचा प्रकार शिरगावातून समोर आला आहे. महाराष्ट्रातील एक शेतकरी ३१ लाखांच्या फॉर्च्युनर गाडीमधून वांगे विकत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सदर व्हिडिओमध्ये फॉर्च्यूनर गाडीच्या डिक्कीमध्ये भाजीपाला ठेवून हा व्यक्ती भाजी विकत असल्याच दिसून येत आहे. ही गाडी एका डॉक्टरची असल्याचं या भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्याने म्हटलं आहे. तसेच या डॉक्टरने भाजी विक्रीसाठी ती गाडी आपल्याला दिल्याचंही त्यांनी आपल्या व्हिडिओमधून सांगितलं आहे. साड्या कोरोनाच्या संसर्गामुळे गावोगावी जाऊन भाजी-विक्री करता असल्याचे त्या शेतकऱ्याने सांगितले आहे.
मात्र 31 लाख रुपयांच्या गाडीमध्ये भाजीपाला विक्री करत असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तसेच काही लोक या गाडी जवळ उभे राहून भाजी खरेदी करताना देखील पाहायला मिळत आहेत. नेमकं हा व्हिडिओ कोणत्या शिरगावातला आहे, हे व्हिडिओमधून स्पष्ट झालेलं नसलं तरी हा महाराष्ट्रातीलच व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे. सध्या हा विडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होताना दिसत आहे.