ड्रग्ज प्रकरणात यापूर्वी सुद्धा अनेकअभिनेत्यांची आणि अभिनेत्रीची चौकशी करण्यात आली होती. तसेच दक्षिण सिनेसृष्टीतील काही बड्या अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहे. अभिनेता राणा दग्गुबाती’ची ड्रग्ज प्रकरणात ७ तास चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ७ तास चौकशी केल्यानंतर राणाला ईडीने कार्यालयातून सोडलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ४ वर्ष जुन्या ड्रग्ज प्रकरणात झालेल्या आर्थिक देवाणघेवाणवरुन ईडीने राणा दग्गुबातीला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. या प्रकरणाची एकूण ईडीने ७ तास चौकशी केली आहे. राणा दग्गुबातीला ईडीने समन्स बजावल्यामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ माजली होती. तसेच राणाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.
यापुर्वी ईडीकडून ३ सप्टेंबरला अभिनेत्री रकुलप्रीत हीची ५ तास चौकशी करण्यात आली होती. ईडीने रकुलप्रीत, राणा दग्गुबातीसह एकूण १२ जणांना चौकशीसाठी नोटीस जारी पाठवली होती. यापुर्वी २०१७ मध्येही विशेष पथकाने ड्रग्जप्रकरणी या १२ सेलिब्रेटींची चौकशी केली होती. यामध्ये मनी लॉन्ड्रींगचे प्रकरण समोर आलं होते यामुळे राणाला या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने बोलावले होते.