दिशा सलानीचा शेवटचा व्हिडिओ वायरल, सहभागी होते फक्त जवळचे मित्र….!
अभिनेता सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडलेल्या पाहावयास मिळालेल्या आहे. आता सुशांत सिह राजपूत प्रकरणाचा तपस बिहार पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना सुशांतची मॅनेजर दिशा सलानी हीच आत्महत्या पूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे.
आत्महत्येपूर्वी ती एका पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्या पार्टीत तिने आपल्या मित्र-परिवारासोबत खूप एन्जॉय केलं होतं. पार्टी तिच्या मित्राच्या घरी होती आणि पार्टीनंतर तात्काळ तिची आत्महत्या झाल्याचे बातमी समोर आली होती.
दिशा सलानीच्या या व्हिडिओत तिच्या खूप जवळचे मित्र आहेत. तसेच या व्हिडिओत ती अतिशय आनंदी दिसत आहे. हृतिकच्या ‘मिशन कश्मीर’ सिनेमातील ‘रिन्द पोशमाल’ या गाड्यावर डान्स करत आहे. ६ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांचे डीसीपी विशाल ठाकूर यांनी सांगितलं की, ते दिशाच्या आणखी एका रिपोर्टची वाट पाहतात.