धीरेंद्र महाराजांचा सोशल मीडियावर डंका FB आणि Twiter वर फॉलोअर्सची संख्या वाढली

 

अनिस यांनी धीरेंद्र महाराजांना विरोध केल्यानंतर चर्चेत आलेले महाराष्ट्रासह देशात चर्चेत आलेले धीरेंद्र महाराज यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. धीरेंद्र महाराजांचे सोशल मीडियावरच्या फॉलोवर्सची संख्या झपाट्यानं वाढली आहे. धीरेंद्र महाराज हे बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रात यांचा राम कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो वेळेत पारही पडला. पण, त्यांच्या याच कार्यक्रमातील दिव्य दरबारवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी विरोध करत धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं होत.

मात्र या सर्व आव्हान प्रतिआव्हानाचा फायदा धीरेंद्र महाराजांनाच झालेला दिसतोय. धीरेंद्र महाराजांचे 11 जानेवारीला 35 लाख यू ट्यूब सबस्क्राईबर्स होते. आजच्या घडीला हा आकडा 38 लाखांवर गेले. वादानंतर तीन लाखांनी सबस्क्राईबर्स वाढले. 11 जानेवारीला फेसबुक फॉलोअर्सची संख्या 26 लाख होती. आता हीच संख्या फेसबुकवर 30 लाख झाली आहे. इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्याही एक लाखांवरुन तीन लाखांवर गेली आहे.

सह महिन्यांपूर्वी धीरेंद्र महाराजांच्या यूट्यूब चॅनेलला गोल्डन बटन मिळाले आहे. जेव्हा तुमच्या चॅनेलचे सब्सक्राईसबर्सची संख्या 1 मिलिअन म्हणजे 10 लाख होते त्यावेळी तुम्हाला गोल्डन बटन मिळते. आता धीरेंद्र शास्त्री यांच्या सब्सक्राईबर्सची संख्या 40 लाखावर गेली आहे. धीरेंद्र महाराज सोशल मीडियावर लोकप्रिय होते परंतु आता त्यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या तुकोबांसंदर्भात बोलताना धीरेंद्र महाराजांची जीभ घसरली आणि नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावरून त्यांना विरोध सुद्धा झाला होता मात्र काही वेळातच त्यांनी आपले शब्द मागे घेत या वादावर पडदा टाकला होता.

Team Global News Marathi: